पिंपरी (Pclive7.com):- भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्याचे महामंत्री मधुकर बच्चे यांची पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालय प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे यांनी पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली.

मधुकर बच्चे हे पक्ष संघटन आणि कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवणारे सक्रिय पदाधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नियुक्तीमुळे पक्षाचे प्रशासकीय व संघटनात्मक कामकाज अधिक प्रभावीपणे राबविले जाईल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष सदाशिव खाडे, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, विकास डोळस, महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे, युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश यादव, माजी नगरसेवक राजू दुर्गे, कार्यालय प्रमुख संजय परळीकर यांच्यासह मनोज ब्राह्मणकर, विशाल वाळुंजकर, अजय पाताडे, संतोष तापकीर, प्रदीप बेंद्रे, जोशना कलाटे, मनीष पंजाबी, हर्षदा मोरे, राजश्री शहा तसेच पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नियुक्तीबद्दल मधुकर बच्चे यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.





















Join Our Whatsapp Group