
पिंपरी (Pclive7.com):- कल्याण-माळशेज घाट राष्ट्रीय महामार्ग क्र.६१ मौजे करंजाळे गावाच्या ठिकाणी रस्ता खचल्यामुळे माळशेजघाट मार्गे अहिल्यानगर तसेच पुणे येथून मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात आली आहे.

वाहतूक नियमन व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरिता वाहतूक बंद करण्यात आली आहे. आळेफाटा-नारायणगाव-खेड-चाकण-तळे गाव (एमआयडीसी)-लोणावळा खोपोली-मुंबई या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली असल्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आदेश जारी केले आहे.





















Join Our Whatsapp Group