पिंपरी (Pclive7.com):- दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंती निमित्त आकुर्डी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 327 दात्यांनी रक्तदान केले.

आकुर्डीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रमोद कुटे, नगरसेविका वैशाली काळभोर, नगरसेविका अरुणा लंगोटे आणि सामाजिक कार्यकर्ते विशाल काळभोर यांच्या वतीने अजित पवार यांच्या जयंती निमित्त जनसेवा सप्ताह आयोजित केला होता.

बुधवारपासून अन्नदान, महा आरोग्य शिबिर, वृक्षारोपण असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. रविवारी आकुर्डीतील विठ्ठल मंदिर येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. 327 पिशव्या रक्त संकलित झाले.

नगरसेवक प्रमोद कुटे म्हणाले, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहराचा कायापालट केला आहे. त्यांच्यामुळे शहराची ओळख जगाच्या नकाशावर पोहोचली आहे. अजितदादांच्या अकाली जाण्याने शहराची मोठी हानी झाली आहे. त्यांचा वाढदिवस साजरा करण्याऐवजी जयंती साजरी करावी लागत आहे.




















Join Our Whatsapp Group