

‘जेन झी’ पिढीला मार्गदर्शन
तरुणाईला सल्ला देताना मुंढे म्हणाले, “डिजिटल युगात तरुणांचा ‘अटेंशन स्पॅन’ अवघ्या आठ सेकंदाचा झाला असून स्क्रीन टाइम ८-९ तासांवर गेला आहे. केवळ रील्स स्क्रोल न करता विचार करा. प्रवाहातील लाकडाच्या ओंडक्याप्रमाणे वाहून न जाता स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा.”

मुलाखतीतील महत्त्वाचे मुद्दे व किस्से:
शाळेतच पहिला ‘बदली’चा अर्ज: आठवीत असताना भूगोल विषय न शिकवणाऱ्या शिक्षकाची बदली व्हावी म्हणून शिक्षण अधिकाऱ्यांकडे ‘आदेश’ असा अर्ज दिला होता आणि त्या शिक्षकाची बदली झाली होती, अशी आठवण त्यांनी सांगितली.
बदल्यांविषयी रोखठोक भूमिका: “वारंवार होणाऱ्या बदल्यांचा मला त्रास होत नाही. बदल हा प्रगतीचा भाग आहे; जितक्या जास्त बदल्या होतील, तितके अधिक सकारात्मक बदल घडतील.”
‘बीयर आणू का?’ अन् दिल्ली सोडली: १९९६ मध्ये यूपीएससीच्या तयारीसाठी दिल्लीत गेल्यावर हॉटेलच्या वेटरने ‘बीयर आणू का?’ विचारताच संतापून लगेच बॅग पॅक करून विनातिकीट रेल्वेने प्रवास करत परत आल्याचा किस्सा त्यांनी शेअर केला.
पुण्यातील संघर्षाच्या आठवणी: जयकर ग्रंथालयात अभ्यास करताना मित्राच्या खोलीवर ‘पॅरासाईट’ म्हणून राहणे, ढेकणांमुळे जागून काढलेल्या रात्री आणि चायनीज गाड्यांवर खाल्लेले स्ट्रीटफूड या संघर्षाच्या दिवसांना त्यांनी उजाळा दिला.





















Join Our Whatsapp Group