
एक्झिबिटर्स आणि व्हेंडर्सना सहभागाचे आवाहन
मोशी (Pclive7.com):- पुणे जिल्हा सहकार बोर्ड आणि पुणे जिल्हा गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स महासंघ मर्यादित (चिखली-मोशी शाखा) यांच्या वतीने “गृहनिर्माण संस्था, कचरा व्यवस्थापन, पुनर्विकास आणि क्लस्टर डेव्हलपमेंट परिषद व प्रदर्शन” (९ वी आवृत्ती) चे आयोजन करण्यात आले आहे.

हे दोन दिवसीय प्रदर्शन ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत टाऊन हॉल, चिखली-मोशी, पुणे येथे पार पडणार आहे.

या प्रदर्शनात गृहनिर्माण संस्था, पुनर्विकास (Redevelopment), क्लस्टर डेव्हलपमेंट (Cluster Development – समूह पुनर्विकास), कचरा व्यवस्थापन (Waste Management), सोलर, सुरक्षा यंत्रणा आणि विविध सोसायटी सेवा पुरवणाऱ्या व्हेंडर्स व एक्झिबिटर्सना आपले स्टॉल्स थाटण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. हजारो सोसायटी पदाधिकारी, सभासद आणि नागरिकांपर्यंत आपले उत्पादन व सेवा पोहोचवण्याची आणि क्लस्टर डेव्हलपमेंटबाबत मार्गदर्शन घेण्याची ही सुवर्णसंधी आहे.

अधिक माहिती व स्टॉल बुकिंगसाठी संपर्क:
आशिष सातकर: 98817 47406
विजय महाजन: 73918 81792
विनायक जगताप: 93592 37568


















Join Our Whatsapp Group