
पिंपळे सौदागर (Pclive7.com):- नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून पिंपळे सौदागर येथे सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. उन्नती सोशल फाउंडेशन, लायन्स क्लब ऑफ पिंपळे सौदागर आणि पिंपरी-चिंचवड येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर यांच्या संयुक्त विद्यमाने सलग तिसऱ्या वर्षी हा उपक्रम राबविण्यात आला. या शिबिरात जवळपास ५० जणांनी रक्तदान करून सामाजिक कार्यात सहभाग नोंदविला.

कुंजीर चौकाजवळील उन्नती सोशल फाउंडेशनच्या प्रांगणात मंगळवारी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विधी समिती सदस्या तथा पिंपळे सौदागर प्रभागाच्या नगरसेविका डॉ. कुंदाताई भिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन झाले.

शिबिरात सहभागी झालेल्या रक्तदात्यांची उंची व वजन मोजण्यात आले. तसेच त्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. आधार ब्लड सेंटरच्या वतीने रक्तसंकलन करण्यात आले.

यावेळी उन्नती सोशल फाउंडेशनचे संचालक संजय भिसे, लायन्स क्लबचे अध्यक्ष संजय सोनार, झोनल चेअरपर्सन लॉ. बालाजी जगताप, पिंपरी-चिंचवड आर्किटेक्चर संघटनेचे अध्यक्ष ऋषिकेश देवरे, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सचिव सखाराम ढाकणे, उपाध्यक्ष अनिल कुलकर्णी, पदाधिकारी दिलीप चौगुले, रमेश चांडगे तसेच आनंद हास्य क्लबचे बाळकृष्ण चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

रक्तदान हे जीवनदान असून, अशा सामाजिक उपक्रमांमुळे गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यास मदत होते. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून सामाजिक सेवेचा संदेश देण्यात आला.




















Join Our Whatsapp Group