
धार्मिक कार्यक्रमांसह गीतगायन, रास दांडिया आणि गरबा; महिलांसाठी आकर्षक पैठणी भेट
पिंपरी (Pclive7.com):- लाडशाखीय वाणी समाज विकास मंडळ, पिंपरी-चिंचवड शहर यांच्या वतीने सोळा कुलस्वामिनी तसेच कानुबाई माता उत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी थेरगाव येथील स्व. शंकर (आण्णा) गावडे स्मृती कामगार भवन, शनि मंदिराजवळ येथे हा उत्सव सायंकाळी ५ ते रात्री १०.३० या वेळेत पार पडणार आहे.

शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर समाजबांधवांना एकत्र आणणे, धार्मिक परंपरा जपणे तसेच समाजातील एकोपा वृद्धिंगत करणे या उद्देशाने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक घरात कुलस्वामिनी, कानुबाई माता तसेच सर्व देवींची आराधना केली जाते. हीच श्रद्धा आणि परंपरा सामूहिक स्वरूपात साजरी करण्यासाठी मंडळाने पुढाकार घेतला आहे.


















Join Our Whatsapp Group