पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर (गणेशम्, बीआरटी रोडलगत) येथे नव्याने सुरू केलेल्या ग्लोबल आय इन्स्टिट्यूटच्या वतीने अंधत्व निवारणासाठी “नेत्रदान काळाची गरज” या विषयावर जनजागृती मोहीम राबवण्यात आली. यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे आदी मान्यवर उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहरात २००८ साली पहिली नेत्रपेढी सुरू करणारे नेत्रतज्ञ डॉ.बबन डोळस, रेटीनातज्ञ डॉ. निलेश चाकणे, कॉर्निया तज्ञ डॉ.सुमित वानखेडे यांनी यांनी मार्गदर्शन केले.
डोळ्यांच्या उपचाराविषयी विविध तपासण्या व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेच्या उपचारपद्धती विषयक माहिती रेटीनातज्ञ संचालक डॉ.निलेश चाकणे यांनी दिली. आत्याधुनिक पद्धतीमुळे व नेत्रपेढी यामुळे अंधत्व निवारणात ग्लोबल आय इन्स्टिट्यूट मोठे योगदान देत राहील, असा विश्वास कॉर्नियातज्ञ संचालक डॉ.सुमित वानखेडे यांनी व्यक्त केला.
ग्लोबल आय इन्स्टिट्यूट हे सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून भविष्यात जनजागृतीचे विविध उपक्रम राबवणार आहे, असे संचालक डॉ.बबन डोळस यांनी सांगितले. याचाच एक भाग म्हणून येत्या १० ते १६ मार्च रोजी जागतिक काचबिंदू सप्ताहानिमित्त ग्लोबल आय इन्स्टिट्यूट येथे मोफत काचबिंदु निदान व सवलतीच्या दरात तपासणी व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत असे त्यांनी सांगितले.






















Join Our Whatsapp Group