गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर पक्षाने दिली महत्वपूर्ण पदाची जबाबदारी
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरामध्ये आक्रमक शिवसैनिक म्हणून ओळख असलेले जितेंद्र ननावरे यांना शिवसेनेने गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर गोड भेट दिली आहे. जितेंद्र ननावरे यांची युवासेना पुणे जिल्हा समन्वयकपदी निवड करण्यात आली आहे. हि निवडगुढी पाडव्याच्या मुहूर्तावर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे व नितीन सरदेसाई यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे.
जितेंद्र ननावरे हे एक सर्वसामान्य कुटुंबातुन आहेत. घरात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना, त्यांनी राजकारणात पाऊल टाकले. आजवर निस्वार्थ भावनेने केलेल्या कामाचे फळ म्हणून त्यांची आज युवासेना पुणे जिल्हा समन्वयकपदी निवड करण्यात आली. ननावरे यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या क्रीडा समिती सभापती पदावर चांगले कार्य केले होते. कार्यक्षम नगरसेवक म्हणून त्यांनी पिंपरी महानगरपालिकेत कार्य केले आहे. सध्या देखील ते शिवसैनिक म्हणून राजकारणात सक्रीय काम करत आहेत. पिंपरी चिंचवडचा आक्रमक शिवसेनेचा छावा म्हणून ननावरे यांच्याकडे पहिले जाते. त्यामुळेच पक्ष बांधणीसाठी व शिवसेनेच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी जितेंद्र ननावरे यांच्यावर महत्वपूर्ण जबाबदारी पक्षाने दिली आहे.
हिंदु ह्रुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार आणि मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली तळागाळातल्या घटकापर्यंत युवासेनेचे विचार मी पोहचवेल असा विश्वास जितेंद्र जनावरे यांनी बोलताना व्यक्त केला.






















Join Our Whatsapp Group