पिंपरी (Pclive7.com):- देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वामुळे भाजपप्रणीत एनडीएला मोठं यश मिळालं. मात्र त्याच वेळी मी ज्या मतदारसंघांमध्ये प्रतिनिधित्व करत होतो त्याठिकाणी आणि आमचा सहयोगी पक्ष असलेल्या शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव झालेला आहे. त्यामुळे गड आला पण सिंह गेला अशी भावना माझ्या मनात असल्याची प्रतिक्रीया भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी Pclive7.com शी बोलतानी दिली आहे.
राजकीय वैर कायमचे बाजुला ठेवून आमदार महेश लांडगे यांनी केंद्रातील नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी अतोनात परिश्रम घेतले. अहोरात्र मेहनत करून भोसरीकरांचा कौल मिळवून दिला. तरी, शिवाजीराव आढळराव पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला. भोसरीच्या बाजीप्रभुने निर्धाराने खिंड लडवली पण शिरूरचा गड शिवाजीरावांच्या हातून निसटल्याचा घाव महेश लांडगे यांच्यासह समर्थकांच्या जिव्हारी लागला आहे. त्यांच्या भावना सोशल मीडियातून व्यक्त होत आहेत.
भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात कायमच राजकीय वैर होते. दोघांकडून एकमेकांवर टिकाटिपन्नी केली जात असायची. मात्र, शिरूर लोकसभा मतदार संघातून आढळराव पाटील यांना विजयी करण्याची धुरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महेशदादांवर सोपविली होती. मोदींचे हात बळकट करण्यासाठी आढळरावांशी असलेले राजकीय वैर बाजुला सारून दादांनी मदतीचा हात पुढे केला होता. लोकसभा निवडणुकीत भोसरीतून मताधिक्य मिळवून देण्याचा शब्द दादांनी मुख्यमंत्र्यांना दिला होता. तो पाळला सुध्दा. महेश दादांनी भोसरीतून आढळरावांना 40 हजारहून अधिक मतांचे लीड मिळवून दिले.
रात्रदिवस प्रचारात दादांनी सहभाग घेतला. शेकडो कार्यकर्ते, शिवसैनिकांशी समन्वय ठेवून वातावरण निर्मितीवर त्यांनी भर दिला. आहोरात्र कष्ट करूनही आढळरावांना थोडक्या मतांनी पराभव स्वीकारावा लागल्याने सर्वांना पराभवाचा धक्का बसला आहे. भोसरीत बाजीप्रभुने खिंड लढवली परंतु, शिरूरचा गड शिवाजीरावांच्या हातून थोडक्यात निसटून गेल्याची खंत सोशल मीडियातून व्यक्त होत आहे.






















Join Our Whatsapp Group