पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्र.१० चे लोकप्रिय नगरसेवक तुषार हिंगे यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा, कला व सांस्कृतिक समिती सभापतीपदी निवड झाल्याबद्दल मोरवाडी येथील म्हाडाच्या सोसायटीतर्फे सत्कार करण्यात आला. येथील तक्षशिला हौसिंग सोसायटीमधील ‘F’ बिल्डींग, ओंकार हौसिंग सोसायटीतील ‘R’ बिल्डींग, सुखवानी एम्पारिअर फेज १, तसेच म्हाडाच्या मोरवाडीतील सोसायटीतील चेअरमन व सदस्यांच्यावतीने हा सत्कार करण्यात आला.
यावेळी परिसरातील विविध प्रश्नांवर तुषार हिंगे यांनी चर्चा केली. स्थानिकांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच म्हाडा येथील खुले मैदान पालिकेकडे हस्तांरित करून लवकरच नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे. व परिसरात लवकरच पोलिस चौकी होणार असे अश्वासन हिंगे यांनी दिले. यावेळी चेअरमन गुलेरिया अनिल वनवे, दिपक भोजने, चेअरमन शामराव खाडे, श्रीनिवास खोत, संजय दळवी, संजय सदगर, चव्हाण साहेब, राम शिरोळे व इतर सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन दिपक भोजने यांनी केले होते.





















Join Our Whatsapp Group