पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या रावेत येथील जलउपसा केंद्रापासून जलशुध्दीकरण केंद्र सेक्टर २३ येथे येणाऱ्या मुख्य जलवाहिनीची गळती झाली अाहे. त्याठिकाणी दुरूस्ती करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे गुरूवार दि.१९ मार्च २०२० रोजी पिंपरी चिंचवड शहरातील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत देण्यात आली आहे.
यासंदर्भात महापालिकच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या रावेत येथील जलउपसा केंद्रापासून जलशुध्दीकरण केंद्र सेक्टर २३ येथे येणाऱ्या मुख्य जलवाहिनीची गळती झाली अाहे. त्याठिकाणी दुरूस्ती करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे गुरूवार दि.१९ मार्च २०२० रोजी पिंपरी चिंचवड शहरातील पाणी पुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे. दि.१९ रोजी सकाळचा पाणी पुरवठा करण्यात येईल. त्यानंतर दुरूस्तीच्या कामामुळे शहरातील सर्व भागाचा पाणी पुरवठा होणार नाही. तसेच दुरूस्तीची कामे केल्यामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार दि.२० रोजी शहरात सकाळचा होणारा पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता असल्याची माहिती देण्यात आली आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून काटकसरीने वापर करावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.






















Join Our Whatsapp Group