
मुंबई (Pclived.com):- राज्यात कोरोना विषाणूचा कहर वाढतच चालला आहे. मुंबईतील कस्तुरबा रूग्णालयात ६८ वर्षीय परदेशी व्यक्तींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही व्यक्ती फिलिपिन्सहून आली असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील हा तिसरा बळी असून कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या आता ८९ वर पोहचली आहे.
मुंबईत काल दिवसभरात १४ रूग्ण आढळले आहेत. तर पुण्यात १ पाॅझिटिव्ह रूग्ण आढळला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासाठी चिंता वाढली असून नागरिकांनी घाबरून न जाता, सरकारने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. घरातून बाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.






















Join Our Whatsapp Group