
पिंपरी (Pclive7.com):- ‘कोरोना’ विषाणू संसर्गाच्या भितीमुळे नागरिकांनी घाबरुन न जाता खबरदारी घ्यावी. आम्ही तुमच्या सुरक्षेसाठी २४ तास सज्ज आहोत, असा विश्वास नगरसेवक संदीप वाघेरे यांनी पिंपरीवासियांना दिला आहे. यावेळी स्वतः रस्त्यावर उतरून प्रभागात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला. तसेच स्वतःच्या देखरेखीखाली प्रभागात वारंवार औषध फवारणी आणि धूर फवारणी करून घेतली.
‘कोरोना’ विषाणूची देशभरातील आणि विशेषतः पिंपरी चिंचवड शहरातील प्रसाराची सद्यस्थिती पाहता या विषाणूला प्रतिबंध घालणे अतिशय महत्वाचे आहे. यासाठी विषाणूमुळे होणार्या आजाराच्या प्रतिबंध व उपचारांबाबत सर्वसामान्यामध्ये जनजागृती करण्यासाठी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी पुढाकार घेतला आहे.
पिंपरी प्रभागातील शिंदे आळी, वैभव नगर, बालामन चाळ, वाघेरे आळी, कुदळे कॉलनी ४, वाघेरे कॉलनीसह प्रभागातील विविध लोकवस्ती, कॉलनी, सोसायट्यांमध्ये दररोज औषध फवारणी करण्यात येत आहे. तसेच नगरसेवक संदीप वाघेरे यांनी प्रभागात फिरून नागरिकांशी संवाद साधत जनजागृती केली.
यावेळी नागरिकांना आवाहन करताना नगरसेवक वाघेरे म्हणाले की, कोरोनाविरोधात खबरदारी बाळगणे हाच मुख्य उपाय आहे. नागरिकांनी खोकतांना, शिंकताना नाका तोंडावर रुमाल ठेवावा. दिवसातून किमान चार ते पाच वेळा हात साबणाने स्वच्छ धुवावेत. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. एकमेकांशी बोलतांना अंतर ठेवून बोलावे. श्वसनावाटे विषाणूंचा प्रसार शक्य असल्याने खबरदारी म्हणून मास्क, हॅण्डग्लोव्हजचा वापर करावा. त्यामुळे विषाणूजन्य आजारांपासून बचाव करता येईल. लवकरच या आजाराचा आपण मिळुन नायनाट करू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.






















Join Our Whatsapp Group