![](https://pclive7.com/wp-content/uploads/2020/03/IMG-20200322-WA0085-1-1024x512.jpg)
पिंपरी ( Pclive7.com):-महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे, व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून, भविष्यात रक्ताचा तुटवडा होऊ नये साठी रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे.
सुलभाताई सोशल फाऊंडेशन, व शिवसेना यमुनानगर यांच्या वतीने मंगळवार दि. 24 मार्चला सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत पूना सर्जिकल ब्लड बँक यांच्या सहकार्याने एकावेळी केवळ 4 च रक्तदाते रक्तदान करतील अशा पद्दतीने रक्तदान शिबीर नाना नानी पार्क यमुनानगर येथे घेण्यात येत आहे.
तरी इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदान करून या पवित्र कार्यास हातभार लावावा असे आवाहन शिवसेनेच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी केले आहे.