
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या साथरोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासन व राज्य सरकार निकराचे प्रयत्न करीत आहे. बाजारामध्ये सॅनिटायझर मिळत नाही. केंद्र सरकारने सॅनिटायझरचा समावेश ‘अत्यावश्यक’ घटकांत केला आहे. तरी देखील सॅनिटायझर व मास्कचा काळाबाजार सुरु आहे. यासाठी पिंपरी चिंचवड प्रशासनाने नागरिकांसाठी सॅनिटायझर व मास्क मोफत किंवा अल्पदरात उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केली आहे.
पहिल्या टप्प्यात निदान ज्या नागरीकांना ‘होम क्वॉरंटाईन’ केले आहे. त्यांच्या जवळच्या किमान एक किलो मिटर परिघातील सर्व नागरीकांना सॅनिटायझर व मास्क मोफत द्यावेत. त्यासाठी राज्यसरकार व मनपाकडील राखीव अत्यावश्यक निधीचा वापर करावा. नविन भोसरी रुग्णालय व वायसीएम हॉस्पीटलमध्ये हे रुग्ण आणि क्वॉरंटाईन केलेल नागरीक आहेत. त्याच्या किमान तीन किलोमीटर परिघात युध्द पातळीवर औषध फवारणी करावी व मोफत सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप करावे. तसेच सर्व नागरीकांनी देखील प्रशासन सांगितलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. असे आवाहन सचिन साठे यांनी केले.






















Join Our Whatsapp Group