पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहराच्या नजीक मोशी परिसरातील चिंबळी येथील पॉलिमार्क या प्लास्टिक प्रॉडक्ट बनविणाऱ्या कंपनीला आज सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. आगीमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.

आगीची तीव्रता लक्षात घेता राजगुरुनगर नगरपरिषद अग्निशमन दल, पिंपरी-चिंचवड अग्निशमन दल, चाकण एमआयडीसी अग्निशमन दल तसेच पीएमआरडीए अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर वेळीच नियंत्रण मिळवले.

सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, कंपनीमध्ये असलेल्या प्लास्टिक उत्पादनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान, आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीच्या कारणाचा तपास सुरू असल्याची माहिती पीएमआरडीएचे अग्निशमन अधिकारी शंतनु गायकवाड यांनी दिली.





















Join Our Whatsapp Group