पिंपरी (Pclive7.com):- देहू येथील भंडारा डोंगर परिसरात एक दीड वर्षीय गोंडस चिमुकले बाळ सापडल्याची हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. बाळाला स्वतःचे नाव, घराचा पत्ता किंवा कोणतीही माहिती सांगता येत नसल्याने त्याच्या आई-वडिलांचा शोध घेण्यासाठी प्रशासन आणि पोलीस यंत्रणा प्रयत्नशील आहेत.

सध्या या बाळाला पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात सुरक्षित ठेवण्यात आले आहे. येथे महिला पोलीस कर्मचारी राणी राऊत या बाळाची अगदी आईप्रमाणे काळजी घेत आहेत. बाळाला जेवण भरवणे, त्याची वैद्यकीय तपासणी करून घेणे तसेच आवश्यक ती सर्व काळजी घेण्याची जबाबदारी त्या पार पाडत आहेत.
मात्र, हा सांभाळ तात्पुरता असून या चिमुकल्याला त्याच्या आई-वडिलांपर्यंत सुखरूप पोहोचवणे हेच सर्वांचे प्रमुख उद्दिष्ट आहे. यासाठी पोलीस आणि संबंधित यंत्रणा विविध माध्यमांतून पालकांचा शोध घेत आहेत.

नागरिकांनीही या घटनेकडे केवळ एक बातमी म्हणून न पाहता, या बाळाची माहिती आणि व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन करण्यात येत आहे. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे या चिमुकल्याचा आपल्या कुटुंबाशी पुन्हा मिलाप होऊ शकतो. या बाळाबाबत कोणाकडेही माहिती असल्यास त्यांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.





















Join Our Whatsapp Group