पिंपरी (Pclive7.com):- मूळचे आंध्रप्रदेशचे रहिवासी असलेले ९ विद्यार्थी परवा दुपारी खराडी या परिसरातून त्यांच्या मूळ गावी NSUI च्या मार्फत पाठवण्यात आले. त्यातील एका विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील प्रमुख व्यक्तीची विशाखापट्टानम येथील वायू गळतीच्या अपघातात मृत्यू झाल्याचे समजले व त्वरित त्यांचे जाण्यासाठी गाडी व परवानगी यांची मदत NSUI चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष उमेश खंदारे यांच्या मार्फत करण्यात आली.
परंतु जेव्हा हे विद्यार्थी आंध्रप्रदेशच्या सीमेजवळ पहाटे ५ च्या सुमारास पोचले तेव्हा या विद्यार्थ्यांना राज्यात प्रवेश नाकारण्यात आला. वारंवार विनंती करून सुद्धा त्यांची एकही गोष्ट स्थानिक पोलिसांनी ऐकली नाही. शेवटी त्यांनी NSUI चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष उमेश खंदारे यांना पुन्हा संपर्क साधला व मदत करण्यास सांगितले. ताबडतोब त्यांचे मार्फत आंध्रप्रदेशमधील स्थनिक काँग्रेस, NSUI च्या कार्यकर्त्यांना संपर्क साधून तेथील काही अधिकाऱ्यांशी बोलून संध्याकाळी ४ च्या सुमारास त्या विद्यार्थ्यांना सदर राज्यात प्रवेश देण्यासाठी परवानगी मिळवून देण्यात आली.
त्यांनी केलेल्या या कामाचे इतर विद्यार्थ्यांच्या घरच्यांनी खुप कौतुक केले. तसेच आंध्रप्रदेशात कुटुंबासाहित येण्याचे आमंत्रणही दिले. जर आपण महाराष्ट्रातून इतर राज्यात प्रवास करत असाल तर तेथील राज्यात प्रवेश मिळावा याची परवानगी आवश्यक घ्या. अन्यथा अडकून पडण्याची नामुष्की येऊ शकते असे आवाहन NSUI चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष उमेश खंदारे यांचे मार्फत करण्यात आले आहे.
























Join Our Whatsapp Group