पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र नाभिक महामंडळ- दिघी शाखेच्या वतीने नाभिक समाजावर अन्याय होत असल्याच्या कारणावरून आज (दि.०९) आंदोलन करण्यात आले.
नाभिक संघटनांनी वेळोवेळी सरकारकडे सलून व्यवसाय चालू करण्यासंदर्भात पाठपुरावा केला आहे. पण त्याची शासनाने कोणतीही दखल घेतली नाही. ८४ दिवसांच्या बंदमुळे नाभिक समाज अडचणीत आला आहे. त्यामुळे आज दिघी शाखेने पोत्यावर बसून ग्राहकाचे केस कापुन शासनाचे लक्ष नाभिक समाजाकडे वळविण्याचा प्रयत्न केला आहे. सलून व्यवसाय चालू करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आजच्या आंदोलनात दिघी शाखेचे अध्यक्ष सागर आढाव, उपाध्यक्ष संदीप दळवी, रामरतन जाधव, युवक अध्यक्ष गिरी एस राज, युवक उपाध्यक्ष इकबाल शेख, इरफान शेख, कार्याध्यक्ष संदीप पंडित, रामदास पवार तसेच संघटनेचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
























Join Our Whatsapp Group