आळंदी (Pclive7.com):- परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे आळंदीतील अनेक सखल भागांमध्ये पाणी शिरल्याने २५० पेक्षा अधिक नागरिक अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे.

परिस्थितीची गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस, अग्निशमन दल तसेच आपत्ती व्यवस्थापन पथकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले आहे. अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून अनेकांची यशस्वीरित्या सुटका करण्यात आली आहे.

प्रशासनाकडून नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून आवश्यक नसल्यास घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. बचाव पथके परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व यंत्रणा सज्ज आहेत. मुसळधार पाऊस कायम असल्याने इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.




















Join Our Whatsapp Group