पिंपरी (Pclive7.com):- किरकोळ भांडणाच्या रागातून एका तरुणाचा हातोड्याने डोक्यात वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना चऱ्होली खुर्द परिसरात घडली आहे. या प्रकरणी आळंदी पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ जुलै रोजी रात्री सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास घोलप वस्ती, काकडे सिटी, चऱ्होली खुर्द (ता. खेड) येथे ही घटना घडली. याप्रकरणी कंत्राटदार चंद्रकांत पंढरीनाथ भाळे (वय ४३, देहू फाटा) यांनी फिर्याद दिली आहे.

मृत व्यक्तीची ओळख करवीरसिंग उर्फ करवीरसिंग नथुसिंग लोधी (रा. छापरी ठाकूर, जिल्हा दमोह, मध्य प्रदेश) अशी असून, आरोपी साहिल रामदास दाभाडे (वय २९, रा. घोलप वस्ती, काकडे सिटी, चऱ्होली खुर्द) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यावेळी आरोपीने संतापाच्या भरात हातोड्याने डोक्यावर वार केल्याने संबंधित तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ हे करीत आहेत.




















Join Our Whatsapp Group