पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत पावसामुळे ३ जुलै रोजी १२ तर ४ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत १५ अशा एकूण २७ झाड पडण्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांची माहिती प्राप्त होताच महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने संबंधित ठिकाणी तात्काळ धाव घेऊन झाडे व फांद्या हटविण्याची कार्यवाही केली. तसेच वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी रस्ते त्वरित मोकळे करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

३ जुलै रोजी चापेकर चौक (चिंचवडगाव), इंद्रायणी नगर (भोसरी), मोरवाडी कोर्ट (पिंपरी), सेक्टर २२ (निगडी), अशोक हॉटेल (फुगेवाडी), भारती हॉस्पिटल (काळेवाडी), यमुनानगर (निगडी), मोरवाडी कोर्ट (पिंपरी), सेक्टर २२ (निगडी), अशोका हॉटेल (फुगेवाडी), पूर्णानगर (प्राधिकरण), कोकणे चौक (पिंपळे सौदागर) परिसरातील विविध ठिकाणी झाड पडण्याच्या घटना घडल्या.

तसेच ४ जुलै रोजी निगडी पोलीस स्टेशन (निगडी), कुणाल आयकॉन रोड (पिंपळे सौदागर), त्रिवेणी नगर (निगडी), स्वामी समर्थ मंदिर (किवळे गावठाण), गुळवे वस्ती (भोसरी), इंद्रायणी नगर (भोसरी), खराळवाडी (पिंपरी)(मोशी), चक्रपाणी वसाहत (भोसरी), आरटीओ ऑफिस (मोशी), शास्त्रीनगर (कासारवाडी), टिळक हॉटेल (दापोडी), नाशिक फाटा (कासारवाडी), खंडोबा माळ (आकुर्डी) आणि केशवनगर (पचिंचवड) परिसरात झाड पडल्याच्या घटना नोंदविण्यात आल्या.

अशा विविध ठिकाणी ३ आणि ४ जुलै रोजी एकूण २७ झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. तरी नागरिकांनी पावसाळ्यात मोठ्या झाडांच्या परिसरात आवश्यक ती खबरदारी घ्यावी. तसेच आपत्कालीन परिस्थितीत महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.




















Join Our Whatsapp Group