पिंपरी (Pclive7.com):- कासारवाडी जवळील कुंदननगर येथे आज सकाळी एसटी बस आणि चारचाकी कार यांच्यामध्ये अपघात झाला. अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एसटी बस व कार यांची धडक झाली. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून, जखमींबाबत अधिकृत माहिती मिळणे बाकी आहे. या अपघातानंतर याठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेतले.
पोलिसांकडून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
(बातमी अपडेट होत आहे.)




















Join Our Whatsapp Group