पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने चिखली डिफेन्स कॉलनी परिसरातील अंदाजे १०० कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आहे. या कुटुंबांना चिखली गावठाण येथील महापालिका शाळेत हलविण्यात आले असून त्यांच्या निवासाची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे.

स्थलांतरित नागरिकांसाठी वैद्यकीय सेवा, भोजन तसेच इतर आवश्यक सुविधांची उपलब्धता प्रशासनाकडून करण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत संबंधित यंत्रणा परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

दरम्यान, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे तसेच आवश्यक असल्यास तात्काळ मदत व संपर्क क्रमांकांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




















Join Our Whatsapp Group