पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. आज (दि. ६ जुलै) दुपारी १२ वाजेपर्यंत पवना धरण ४५.८१ टक्के भरले असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

धरण परिसरात संततधार पाऊस सुरू असल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. परिणामी पवना नदी दुधडी भरून वाहत असून नदीकाठच्या भागांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, जोरदार पावसामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले असून काही ठिकाणी वाहतूक बंद करण्यात आली आहे. नदी आणि नाल्यांच्या पाण्याची पातळी वाढल्याने अनेक भागांमध्ये पाणी शिरल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान विभागाने पुढील काही तासांतही जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने धरणातील पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि स्थानिक यंत्रणा सतर्क असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




















Join Our Whatsapp Group