पिंपरी (Pclive7.com):- कोरोनामुळे पिंपरी चिंचवडकरांची चिंता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आज शहरातील बहुतांश भागात कोरोनाचे ५६ ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण आढळल्याने भविष्यात कोरोनाचा विळखा आणखीनच घट्ट होणार की काय? अशी भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान आज शहरात कोरोनामुळे जळगाव येथील ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून आजपर्यंत शहरातील कोरनाबाधितांचा आकडा ८४३ वर पोहोचला आहे.
लॉकडाउनमधील शिथीलता कमी केल्यामुळे शहरात सर्वच दुकाने, बाजारपेठा सुरू झाल्या आहेत. मात्र सर्वत्र नागरिकांची गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळेच गेल्या आठवडाभरापासून शहरात कोरोनाच्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज शहरातील कस्पटेवस्ती वाकड, अजंठानगर, खंडोबामाळ भोसरी, आनंदनगर, काळभोरनगर, साईबाबानगर चिंचवड, पवारवस्ती दापोडी, पाटीलनगर चिखली, बौध्दनगर, नाणेकरचाळ पिंपरी, गुलाबनगर दापोडी, जुनी सांगवी, सिध्दार्थनगर दापोडी, बेलटिकानगर थेरगांव, वाकड, गुरुदत्त कॉलनी वाल्हेकरवाडी, नवीसांगवी, नढेनगर काळेवाडी, दिघी, विनायकनगर पिंपळे निलख, शाहूनगर चिंचवड, पिंपरीगांव, आदित्यबिर्ला कॉलनी थेरगांव या भागात तब्बल ५६ बाधित रुग्ण आढळले आहेत. यात ३३ पुरूष तर २३ महिलांचा समावेश आहे. तर हद्दीबाहेरील बोपोडी, जळगांव व हडपसर येथील तीन कोरोनाग्रस्त रुग्ण शहरातील रुग्णालयात दाखल झाले आहेत. शहरात सध्या ३२८ बाधित रुग्णांवर उपचार सुरू असून, आज जळगाव येथील एक ४५ वर्ष व्यक्तीचा वायसीएम रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच आज लिंकरोड पिंपरी, जुनीसांगवी, जयभवानी नगर दापोडी, इंदिरानगर चिंचवड, आनंदनगर चिंचवड, महात्माफुलेनगर, भाटनगर, समतानगर नवीसांगवी येथील रहिवासी असलेले ९ रूग्ण ‘कोरोनामुक्त’ झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला असून आजअखेर शहरातील ४८१ जण ‘कोरोनामुक्त’ झाले आहेत.























Join Our Whatsapp Group