पिंपरी (Pclive7.com):- ‘कोविड – १९’ मदत कार्य म्हणून IDBI बँकेने आपला ४० लाख रूपयांचा निधी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना सुपूर्त केला. या प्रसंगी आयुक्तांनी IDBI बँकेचे आभार मानून, सदर निधी हा ‘कोविड – १९’ प्रतिबंधात्मक आणि उपाययोजना या कामासाठी वापरला जाईल असे नमूद केले. IDBI बँकेच्या वतीने वरिष्ठ अधिकारी संजय पानीकर आणि आशिष मिश्रा यांनी हा निधी महानगरपालिकेस सुपूर्त केला.
याप्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील व अजित पवार तसेच मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण उपस्थित होते.























Join Our Whatsapp Group