पिंपरी (Pclive7.com):- संपूर्ण महाराष्ट्रात धनगर समाजाचे संघटन आणि त्यांच्या न्याय हक्काकरिता लढा देण्यासाठी ‘एल्गार सेना महाराष्ट्र’ या संघटनेची स्थापना १७ ऑक्टोबर २०२० रोजी घटस्थापनेच्या दिवशी दुर्गा देवीचा आशीर्वाद घेऊन, पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या आशीर्वादाने अधिकृतरित्या केली जाणार आहे. तत्पुर्वी संघटनेच्या बांधणीचे कार्य सुरू केले असून पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि मावळ विधानसभा अध्यक्षांसह चिंचवड विधानसभा एल्गार सेना महिला ब्रिगेड अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र एल्गार सेनेचे संस्थापक राजाभाऊ दुर्गे यांनी दिली आहे.
नियुक्ती अनुक्रमे भोसरी विधानसभा : श्री गजानन वाघमोडे, मावळ विधानसभा : श्री राजेंद्र गाडेकर, पिंपरी विधानसभा : श्री लक्ष्मण टकले, आणि चिंचवड विधानसभा : श्री अनुराज दुधभाते हे विधानसभा अध्यक्ष त्याच बरोबर चिंचवड विधानसभा एल्गार सेना महिला ब्रिगेड अध्यक्षपदी सौ.सिमा स्वप्निल शेंडगे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
यासंदर्भात महाराष्ट्र एल्गार सेना संस्थापक राजाभाऊ दुर्गे यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, धनगर समाजाचे हे संघटन एल्गार सेनेच्या माध्यमातुन महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक गावात, प्रत्येक नगरात समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. आमच्या कामावर आणि विचारांवर विश्वास असणाऱ्या समाज बांधवांची, युवकांची आणि महिलांची सक्षम टिम या संघटन कार्यातुन उभी केली जाणार आहे.
महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात एल्गार सेनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, महिला ब्रिगेड अध्यक्ष आणि युवा ब्रिगेड अध्यक्ष अशा ५ सक्षम कार्यकर्त्यांची वज्रमुठ तयार केली जाणार आहे. जी अत्यंत भक्कम असणार आहे. एल्गार सेनेचे प्रत्येक विधानसभेतील ही पंचक टीम त्या-त्या विधानसभा क्षेत्रातील निर्णय प्रक्रिया प्रमुख टीम (कोअर टीम) म्हणुन कार्यरत असणार आहे.
या कोअर टीमच्या माध्यमातुन त्या-त्या विधानसभेत एल्गार सेनेच्या शाखा तयार केल्या जाणार आहेत. १७ ऑक्टोबर २०२० रोजी घटस्थापनेच्या दिवशी दुर्गा देवीचा आशीर्वाद घेऊन, पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या आशीर्वादाने या एल्गार सेनेची अधिकृत घोषणा १७ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता फेसबुक लाईव्हद्वारे करण्यात येईल.
धनगर समाजाचे पक्के संघटन या उद्देशाने उदयास येणार असलेल्या महाराष्ट्र एल्गार सेनेचे १७ ऑक्टोबर २०२० पुर्वी किमान २० विधानसभा अध्यक्षांची अधिकृत घोषणा केली जाईल. उर्वरित विधानसभा अध्यक्ष हे आगामी ३ महिन्यात पुर्ण करुन त्यानंतर जिल्हा कार्यकारिणी आणि सर्वात शेवटी प्रदेश कार्यकारिणी जाहीर करण्याचे एकुणच नियोजन असल्याचे एल्गार सेना महाराष्ट्रचे संस्थापक राजाभाऊ दुर्गे यांनी म्हटले आहे.






















Join Our Whatsapp Group