पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाच्या या महासंकटात प्लाझ्मा दान संकलनात सामाजिक कार्यकर्ते प्रहार रुग्णसेवक संजय गायखे यांनी अभूतपूर्व कार्य केले आहे. त्यांच्या कामगिरीबद्दल शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काल दि.२ ऑक्टोबर रोजी पक्षाचा एक कार्यक्रम आकुर्डी येथे पार पडला. या कार्यक्रमात संजय गायखे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नगरसेवक अजित गव्हाणे, शाम लांडे, पंकज भालेकर, विक्रांत लांडे, सुलक्षणा शिलवंत, प्रवक्ते फजल शेख, युवा नेेते निहाल पानसरे यांच्यासह पक्षाचे आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कोरोनाच्या या संकटात प्लाझ्मा थेरपी वरदान ठरत आहे. एकीकडे महापालिका प्रशासनाकडून प्लाझ्मा संकलनात उदासिनता दिसत असताना सामाजिक कार्यकर्ते संजय गायखे यांनी कौतुकास्पद कार्य केले आहे. कोरोनातून पूर्णपणे बरे झालल्या रूग्णांची माहिती घेऊन त्यांना प्लाझ्मा दान करण्यासाठी जनजागृती तसेच प्रेरित करण्याची भूमिका ते बजावत आहेत.
पिंपरी चिंचवड शहरात आजपर्यंत ८० हजार कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत. तर तब्बल ७२ हजारांहून अधिक जणांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान शहरातील १३३७ रूग्ण तर शहराबाहेरील ५०० रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत संजय गायखे यांनी प्लाझ्मा दान जनजागृतीची महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. संजय गायखे यांनी आजपर्यंत एकूण ३०० हून अधिक जणांना प्लाझ्मा दान करण्यास प्रेरित केले आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल राष्ट्रवादीने त्यांचा शाल, श्रीफळ देवुन सन्मान केला.






















Join Our Whatsapp Group