पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील ९ वी ते १२ वीच्या शाळा, महाविद्यालये ४ जानेवारी २०२१ पासून प्रत्यक्षात सुरु होणार आहेत. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत पालकांकडून आवश्यक ती लेखी संमती घेणे बंधनकारक आहे. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काढले आहेत.
राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत सर्व आस्थापना टप्या-टप्प्याने सुरु करण्यात येत आहेत. त्यानुसार २३ नोव्हेंबर २०२० पासून राज्यातील ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरु करण्याचे नियोजन केले होते. परंतु, दिवाळीनंतर रुग्णसंख्येत वाढ होत होती. पिंपरी चिंचवड शहरातील रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने आणि शिक्षकांच्या कोरोनाच्या चाचण्या पूर्ण झाल्या नसल्याने पिंपरी चिंचवड महापालिकेने ३० नोव्हेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
पुन्हा त्यामध्ये वाढ करत १३ डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पुन्हा ३ जानेवारी २०२१ पर्यंत शाळा बंद ठेवण्याच्या निर्णयात वाढ केली होती. आता शाळा बंद ठेवण्याचा आदेश मागे घेत महापालिका हद्दीतील ९ वी ते १२ वीच्या शाळा, महाविद्यालये ४ जानेवारी २०२१ पासून सुरु होणार आहेत. याबाबतचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काढले आहेत.
शाळा, महाविद्यालये सुरू करण्याच्या मार्गदर्शक सूचना खालील प्रमाणे..!
● शाळा सुरु करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील.
● शाळेत स्वच्छता व निर्जुंतीकरण विषय सुविधा सुनिश्चित करणे
● हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करणे
● थर्मामीटर, थर्मल स्कॅनर, गण, ऑक्सीमीटर, जंतूनाशक, साबण, पाणी
● शाळा वाहतूक सुविधांचे निर्जंतुकीकरण सुनिश्चित करावे.
● शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांची कोविडची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक असेल. चाचणीचे प्रमाणपत्र शाळा दप्तरी ठेवण्यात यावे.
● वर्गखोली, स्टाफ रुममधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतराच्या नियमांनुसार असावी.
● शाळेत दर्शनी भागावर सुरक्षित अंतर, मास्कचा वापराबाबत मार्गदर्शक सूचना असणारे पोस्टर प्रदर्शित करावेत.
● विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची लेखी सहमती शाळा प्रमुखांनी प्राप्त करुन घ्यावी.
● शाळेत व शाळेच्या परिसरात स्वच्छता व आरोग्यदायी परिस्थिती राखण्याकरिता शाळेचा परिसर दररोज नियमितपणे स्वच्छ केला जातो का, स्वच्छतागृहांचे वारंवार निर्जंतुकीकरण केले जाते का, याबाबतची शाळेच्या मुख्याध्यपकांनी खात्री करुन घेणे आवश्यक राहील.
● विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी शाळा वाहतुकीच्या वाहनांचे दिवसातून किमान दोनवेळा (विद्यार्थी वाहण्यात बसण्याअगोदर व उतरल्यानंतर) निर्जुंतीकरण केले जाते का, याची खातरजमा शाळा व्यवस्थापनाने करावी.























Join Our Whatsapp Group