पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक १४, मोहननगर, काळभोरनगर, रामनगर या परिसरात अनेक अधिकृत टपऱ्या आहेत. या टपऱ्यांचा नागरिकांसह वाहतुकीला अडथळा होत आहे. त्यामुळे या भागातील अनधिकृत टपऱ्या हटवून त्यांचे हॉकर्स झोनमध्ये पुनर्वसन करण्याची मागणी शिवसेना नगरसेविका मीनल यादव यांनी केली आहे.
या संदर्भात यादव यांनी ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रशासन अधिकारी सुचेता पानसरे यांना निवेदन दिले आहे. प्रभाग क्रमांक १४ मध्ये मोहननगर येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार ते काळभोरनगर येथील मेहता हॉस्पिटलपर्यंत रस्त्याचे कॉंक्रिटीकरण व सुशोभिकरणाचे काम जोरात सुरु आहे. परिसरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी टपऱ्यांचे अतिक्रमण आहे. त्याचा स्थानिक नागरिकांसह वाहतुकीला अडथळा होत आहे.
त्यामुळे या भागातील टपऱ्या हटवून त्यांचे हॉकर्स-झोनमध्ये पुनर्वसन करावे. यामुळे वाहतुकीला अडथळा होणार नाही तसेच पदपथावरील अतिक्रमणांना आळा बसेल. शिवाय ज्येष्ठ नागरिकांना चालण्यासाठी मोकळी जागा मिळेल असे मीनल यादव यांनी निवेदनात म्हटले आहे.






















Join Our Whatsapp Group