पिंपरी (Pclive7.com) : रावेत परिसरातील श्री संत तुकाराम महाराज पुलाचे सुशोभीकरण करून आकर्षक रंगरंगोटी करण्यात यावी, अशी मागणी युवासेना चिंचवड विधानसभा उपशहरप्रमुख सागर एकनाथ शिंदे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सागर शिंदे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रावेत गाव परिसरातील श्री संत तुकाराम महाराज पुलावरील जुना रंग उडाल्याने पुलाचे सौंदर्य कमी झाले आहे. हा पूल पिंपरी-चिंचवड शहरातील महत्त्वाच्या वाहतूक मार्गांपैकी एक असून दररोज हजारो नागरिक या मार्गाचा वापर करतात.

पुलाची आकर्षक रंगरंगोटी व सुशोभीकरण केल्यास परिसराचे सौंदर्य वाढेल तसेच नागरिकांना स्वच्छ आणि सुंदर सार्वजनिक सुविधा अनुभवता येतील. त्यामुळे महापालिकेने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन पुलाच्या रंगरंगोटीचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

यावेळी सागर शिंदे यांनी परिसरातील नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. नागरिकांमधूनही पुलाच्या सुशोभीकरणाच्या मागणीला पाठिंबा मिळत असून महापालिकेने याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.




















Join Our Whatsapp Group