पिंपरी (Pclive7.com):- शासकीय जनगणनेचे काम पूर्ण करून परतणाऱ्या एका शिक्षिकेसोबत महापालिकेच्या कार्यालयातच गैरवर्तन झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महापालिकेच्या ‘फ’ प्रभाग कार्यालयात ही घटना घडली.

याप्रकरणी महापालिकेच्या नगर नियोजन विभागातील कर्मचाऱ्याविरुद्ध निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली असून महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

निगडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप आडे (वय ४५) असे गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत पीडित शिक्षिकेने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. एका खासगी शैक्षणिक संस्थेत कार्यरत असलेल्या ४७ वर्षीय शिक्षिका शासकीय जनगणनेच्या कामासाठी नियुक्त आहेत. पीडित महिला संबंधित काम पूर्ण करून महापालिकेच्या ‘एफ’ प्रभाग कार्यालयात आल्या होत्या. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्याने त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे.

या प्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून तांत्रिक तपास तसेच सीसीटीव्ही तपासणी सुरू आहे.




















Join Our Whatsapp Group