पिंपरी (Pclive7.com):- आपल्या पिंपरी-चिंचवड मधील ४० वर्षे जुनी सुवर्ण पेढी म्हणजे सत्यम ज्वेलर्स होय.. सचोटी, शुद्धता आणि ग्राहकांचा विश्वास या त्रिसुत्रींच्या मजबूत पायावर गेली अनेक वर्ष सत्यम ज्वेलर्स हे आपला व्यवसाय पिंपरी-चिंचवड शहरामध्ये करत आहेत. सत्यम ज्वेलर्स यांची तब्बल ३ हजार स्केअर फूटची कृष्णानगर येथील शाखा नूतनीकरण करून पुन्हा एकदा ग्राहकांच्या सेवेत हजर झाली आहे. ह्या शाखेचा उद्घाटन सोहळा सौ. जयश्री चोप्रा, सौ. स्वीटी चोप्रा व सौ. लीना चोप्रा यांच्या शुभहस्ते पार पडला.
‘आम्ही नव्या जोमाने, नव्या कलात्मक डिझाइनसह परंतु ४० वर्षांपासून असलेली सर्व मूल्ये जोपासत आपल्या सेवेत पुन्हा एकदा रुजू झालो आहोत’ अशी नम्र भावना श्री. किरणराजजी चोप्रा व श्री. महावीर चोप्रा यांनी व्यक्त केली. ‘काळाबरोबर विचार नाही बदलला पण ग्राहकांना जे जे लागेल ते सर्व सोने, चांदी, डायमंड, प्लॅटिनम दागिने तसेच सर्व प्रकारची रत्ने योग्य दरात लगेच उपलब्ध करून देणे ही आमची खरी ग्राहक सेवा आहे.
तसेच सत्यम ज्वेलर्सच्या सर्व शाखांत म्हणजेच निगडी, कृष्णानगर व चाकण या सर्व ठिकाणी पारंपारिक दागिन्यांबरोबरच नव्या फॅशन व टैंडनुसार टेम्पल तसेच खास अँटिक दागिने उपलब्ध असल्याची माहिती श्री. दीपक चोप्रा व श्री. राहुल चोप्रा यांनी दिली. श्रीगणेशाच्या आगमनाने पवित्र झालेल्या ह्या दिवसांत आपल्याला हवी तशी मनाजोगती सुवर्ण खरेदी करण्यासाठी सत्यम ज्वेलर्सच्या तिन्ही शाखांना जरूर भेट द्यावी.