पिंपरी (Pclive7.com):- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त फोटोग्राफी स्पर्धेचे शासनाकडून नियोजन करण्यात आले आहे. युवक कल्याण मंत्रालय भारत सरकार – नेहरू युवा केंद्र पुणे व देवदत्त फोटोग्राफी स्कूल चिंचवड आयोजित यांचे संयुक्त विद्यमाने हि स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे.
जिल्हास्तर, राज्यस्तर व देशपातळीवरील अशा टप्याने स्पर्धेचे नियोजन करण्यात आले आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील फोटोग्राफर्सना स्वतःला सिद्ध करण्यासाठी हि एक उत्तम संधी आहे. देशपातळीवर सर्वत्र असे नियोजन होणार असून पुणे जिल्ह्यामध्ये युवक कल्याण मंत्रालय भारत सरकार यांचे तर्फे नियोजन व निवड याबाबतची जबाबदारी देवदत्त फोटोग्राफी स्कूल चिंचवड यांना देण्यात आली आहे.
प्रोफेशनल फोटोग्राफर ते मोबाईल फोटोग्राफर यापैकी कुणीही या स्पर्धेत भाग घेऊ शकते. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वय वर्षे १८ ते वय वर्षे २९ अशी वयोमर्यादा आहे. स्पर्धेसाठी खालील विषयातच फोटोची सॉफ्ट कॉपी पाठवायची आहे.
फूड फोटोग्राफी
🌟पोर्ट्रेट
🌟स्ट्रीट
🌟लँडस्केप
🌟वाईल्ड लाईफ
🌟आर्किटेक्चर
स्पर्धक यापैकी कोणत्याही किंवा सर्व विषयात एंट्री पाठवू शकतात. फोटोची सॉफ्ट कॉपी [email protected] या मेल आयडीवर स्वीकारली जाईल.
याच मेल मध्ये स्पर्धाकाचे पूर्ण नाव व आधार कार्डचा फोटो पण अटॅच असणे आवश्यक आहे. तसेच स्वतःचा मोबाईल क्रमांक पण असणे आवश्यक आहे, तरच फोटो ग्राह्य धरला जाईल.
💠 स्पर्धेकाचे वय 18 ते 29 यामध्ये असणे आवश्यक आहे.
💠 मेल वर स्पर्धेसाठी फोटो दिनांक 15 सप्टेंबर 2022 पूर्वी पाठवणे आवश्यक असेल. त्यानंतर आलेले फोटो घेतले जाणार नाहीत.
💠 मोबाईलवर काढलेले फोटो सुद्धा चालणार आहेत.
💠 नेहरू युवा केंद्र, भारत सरकार व देवदत्त फोटोग्राफी स्कूल यांचेकडे स्पर्धेचे सर्व अधिकार राखून ठेवले आहेत.
💠 प्रथम, द्वितीय, तृतीय अशा विजेत्या स्पर्धकांना भारत सरकार युवक कल्याण मंत्रालय नेहरू युवा केंद्र पुणे यांचे बोधचिन्ह असलेले प्रशस्तीपत्र, व स्मृतिचिन्ह समारंभ पूर्वक पुण्यात प्रदान करण्यात येईल.
अधिक माहिती साठी ९८२२९४६३२९ या मोबाईल क्रमांकावर सम्पर्क साधावा असे आवाहन देवदत्त फोटोग्राफी स्कूलचे संचालक देवदत्त कशाळीकर यांनी केले आहे. तसेच नेहरू युवा केंद्राचे मुख्य समन्व्यक वरिष्ठ अधिकारी मा. यशवंत मानखेडकर संपूर्ण नियोजन, मार्गदर्शन करत आहेत.
Tags: देवदत्त कशाळीकरदेवदत्त फोटोग्राफी स्कूल चिंचवडनेहरू युवा केंद्र पुणेफोटोग्राफी स्पर्धाभारत सरकारयुवक कल्याण मंत्रालयशासनाकडून नियोजनस्वातंत्र्याचा अमृत महोत्सव