पिंपरी (Pclive7.com):- पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचावर झालेल्या शाईफेक प्रकरणी अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांवरील कठोर गुन्हे मागे घ्यावे, तसेच पोलिसांवर करण्यात आलेली निलंबन कारवाई मागे घेण्यात यावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहरातील सर्वपक्षीय शिष्ट मंडळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे केली आहे. या शिष्टमंडळाने राज ठाकरे यांची भेट आज भेट घेतली आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर महापुरुषांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्य प्रकरणी निषेध करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील शाईफेक घटनेसंदर्भात महापुरुष सन्मान कृती समिती पिंपरी चिंचवडच्या पदाधिकाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन अटक प्रकरणी लावलेले कठोर गुन्हे मागे घेण्याविषयी तसेच याप्रकरणातील निलंबित पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे केलेले निलंबन कारवाई तात्काळ मागे घ्यावी याबाबत चर्चा केली. त्यास ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

या भेटीत समितीचे समन्वयक माजी नगरसेवक मारुती भापकर, मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, पिंपरी चिंचवड काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ.कैलास कदम, वंचितचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत, राष्ट्रवादी झोपडपट्टी विभाग शहराध्यक्ष संतोष निर्संगध, काँग्रेसचे युवा नेते नरेंद्र बनसोडे, गिरीश वाघमारे, शिवशंकर उबाळे, विश्वनाथ जगताप, अविनाश चौधरी उपस्थित होते.
Tags: congressDevendra Tayadekailas kadammaruti bhapkarMnsncpRaj ThackerayRaj thakreSachin ChikaleSulakshana Shilwant






















Join Our Whatsapp Group