पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील कै.बाळासाहेब कुंजीर क्रीडांगण याठिकाणी यशदा रियालिटी ग्रुप, नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन आणि किशान स्पोर्ट्स इंडिया प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “पिंपरी चिंचवड हाफ मॅरेथॉन २०२२” ही स्पर्धा रविवार दि.१८ रोजी यशस्वीपणे पार पडली. पहाटे ५ वा. गुलाबी थंडीत पिंपरी चिंचवडकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ही मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी केली.
कै बाळासाहेब कुंजीर क्रीडांगण पासून सुरु झालेली ही मॅरेथॉन BRTS मार्ग शिवार चौक, कोकणे चौक, PK चौक, गोविंद यशदा चौक, सुदर्शन चौक, नाशिकफाटा मार्गे पुन्हा फिरून याच मार्गे कै. बाळासाहेब कुंजीर क्रीडांगणावर या मॅरेथॉनचे समापन झाले. या स्पर्धेमध्ये ५ किमी, १० किमी आणि २१ किमी या तिन्ही ग्रुप कॅटेगरीमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यामधील सुमारे ३५०० मॅरेथॉनपटूनी सहभाग घेतला होता. लहानग्यांपासून ते वयोवृद्धापर्यंत सर्व जण यावेळी मनसोक्त धावले.
या स्पर्धेमध्ये २१ किमी गट (पुरुष) किरण गांढूळे, अनुराग कोनकर, अंकुश गुप्ता आणि (महिला) ऐश्वर्या खलाडकर, समीक्षा खरे, शर्मिला कदम यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणी तृतीय क्रमांक पटकावले.
या स्पर्धेमध्ये १० किमी गट (पुरुष) अभिषेक देवकाते, प्रधान किरुळकर, मनोज मूंड आणि (महिला) ज्योती चव्हाण, प्रियांका चवारकर, वृषाली उत्तेकर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणी तृतीय क्रमांक पटकावले.
या स्पर्धेमध्ये ०५ किमी गट (पुरुष) अजय क्षीरसागर, प्रणव पाटील, मोहिते यादव आणि (महिला) विनया मालुसरे, गायत्री चौधरी, शेख इस्माईल यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणी तृतीय क्रमांक पटकावले.
यावेळी धावपटूचा उत्साह वाढावा म्हणून जागोजागी ढोल वाजवून त्यांचे स्वागत केले जात होते. स्पर्धेदरम्यान चार ठिकाणी एनर्जी स्टेशन उभे करण्यात आले होते आणि तिथून स्पर्धकांना पाणी, एनर्जी ड्रिंक व फळे पुरविण्यात आले. स्पर्धेदरम्यान रूग्णवाहिकाही तैनात करण्यात आली होती. स्पर्धेसाठी साधारण १०० स्वयंसेवक उपस्थित होते.
परंतु यावर्षीच्या मरेथॉनमध्ये सर्वांचे लक्ष वेधले ते कु.जय या अंध मुलाने ५ किमी गटात त्याने धावत स्पर्धा पुर्ण केली आणि सर्वांचे मन जिंकले. आयोजकांकडून कु.जय याला सन्मानित करण्यात आले.
यावेळी आयोजक शत्रुघ्न काटे, वसंत काटे, शंतणू प्रभुणे, किरण काकुलथे, सुखदेव सिंग तसेच प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, मोरेश्वर शेडगे, संदिप कस्पटे, शशिकांत कदम, प्रभाकर वाघेरे, जयनाथ काटे, भानुदास काटे पाटील, प्रकाश झिंजुर्डे, बाळासाहेब काटे, विजय भिसे, धनंजय ढोरे, कौस्तुभ राडकर, कविताजी रेड्डी, कैलास कुंजीर, संजय भिसे, कुंदाताई भिसे, रोहिदास गवारे, विजय काटे, सागर काटे, संदेश काटे पाटील, रमेश काटे, राहुल काटे, प्रविण कुंजीर, बाळकृष्ण परघळे, दिपक गांगुर्डे, शंकर चोंधे, रेडिओ जॉकी आर जे तरुण, राजू शेलार, गिरीष रोहिडा व इतर मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार विजेती अपर्णाजी प्रभुदेसाई आणि सागर बिरारी यांनी केले.