पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाचे नगरसेवक तुषार कामठे यांनी खोटी शैक्षणिक माहिती दिल्या प्रकरणी सांगवी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी ही तक्रार दाखल केली आहे.
फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत पिंपळे निलख प्रभागात तुषार कामठे भाजपच्या तिकीटावर विजयी झाले. त्यावेळी त्यांनी निवडणुक आयोगाकडे आपली शैक्षणिक माहिती सादर केली होती. त्यात १९९९ मध्ये एफ.वाय.जे.सी. परिक्षा (११ वी) नापास असताना देखील मराठवाडा मित्र मंडळ ज्युनिअर कॉलेज डेक्कन, पुणे येथून मुख्य शाळा सोडल्याचा दाखला दिला होता. मात्र तुषार कामठे यांनी ११ वी पास असल्याचा बनावट दाखला बनवून घेतला. त्यानंतर तो दाखला खरा असल्याचे भासवून सांगवीतील बाबूराव घोलप महाविद्यालयात १२ कॉमर्सला प्रवेश करून घेतला. महापालिका निवडणुकीत तीच बनावट शैक्षणिक कागदपत्रे सादर करून नगरसेवक तुषार कामठे यांनी निवडणुक आयोगाची फसवणूक केली असल्याची तक्रार सचिन साठे यांनी केली आहे.





















Join Our Whatsapp Group