पिंपरी (Pclive7.com):- तडीपार गुंडाला भोसरी पोलिसांनी दापोडी येथून तलवारीसह अटक केले आहे. ही कारवाई रविवारी (दि.८) दापोडी येथील रेल्वे लाईन जवळ करण्यात आली आहे. इम्तीयाज उर्फ ताजइस्माईल शेख (वय ३० रा. दापोडी) असे अटक आरोपीचे नाव असून भोसरी पोलीस ठाण्यात सागर आनंद जाधव यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याला पुणे जिल्हा हद्दीतून पिंपरी-चिंचवड आयुक्तालयच्या परिमंडळ दोन यांनी ५ सप्टेंबर २०२२ रोजी दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वीच तो शहरात आला होता. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याकडून तलवार देखील जप्त केली आहे.

























Join Our Whatsapp Group