पिंपरी (Pclive7.com):- संसदेच्या अधिवेशनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या राज्यातील सर्वपक्षीय खासदारांच्या बैठकीवर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकूनही शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे तिला उपस्थित राहिल्याने काल त्याची मोठी राजकीय चर्चा झाली. ती निवळायच्या आत याच पक्षाचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी, तर थेट मुख्यमंत्र्यांच्या मोटारीतूनच प्रवास केल्याने ही दुसरी चर्चा आज रंगली.

हे दोन्ही खासदार, आमदार पक्षात नाराज असल्याची चर्चा खूप अगोदरपासून सुरु आहे. त्यात पक्षाच्या बैठकांना अनेकदा त्यांनी दांडी मारल्याने या चर्चेने मूळही धरले होते. पण, त्या त्या वेळी या दोघांनीही तसे काही नसल्याचे व आजारी असल्याने वा इतर कारणांमुळे गैरहजर राहिल्याचे सांगितले होते. या चर्चेचा धसका खुद्द पक्षाचे नेते अजित पवार यांनीही घेतला होता. कारण अजित पवार पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यात असताना बनसोडे अनेकदा अनुपस्थित राहिले आहेत.
दरम्यान आमदार अण्णा बनसोडे यांच्याशी Pclive7.com ने संपर्क साधला असता होऊ शकला नाही.






















Join Our Whatsapp Group