भोसरी (Pclive7.com):- भोसरी विधानसभा मतदार संघांचे लोकप्रिय दमदार आमदार महेशदादा लांडगे यांच्या स्थानिक विकास निधीतून मौजे मोरेवस्ती येथील गुरुकुल हौसिंग सोसायटीतील ३०० मीटर रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन पार पडले. नवदुर्गा सखी मंचच्या अध्यक्षा रुपालीताई साने, युवानेते पांडाभाऊ साने आणि सोसायटीतील नागरिक बंधू-भगिनीच्या शुभहस्ते हे भूमिपूजन पार पडले.

युवानेते पांडाभाऊ साने यांच्या पुढाकारने हा भूमिपूजन समारंभ पार पडला. यावेळी सोसायटीतील प्रमुख नागरिकांनी आमदार महेशदादा लांडगे यांचे मनस्वी आभार मानले.

यावेळी गुरुकुल हौसिंग सोसायटीचे चेअरमन रामभाऊ खेडेकर, राजाभाऊ मोरे, संजयभाऊ मोरे, भारतशेठ गावडे, संतोषभाऊ गडतरे, रामोजी यादव, संतोषअण्णा मोरे, बळीभाऊ वाडेकर, हरिश्चंद्र यादव, निरज मोरे, विनायक मोरे, ओमकार मोरे व सोसायटीतील जेष्ठ-श्रेष्ठ नागरिक तसेच गुरुकुल सोसायटीतील महिला माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags: आमदार महेश लांडगेआमदार विकास निधीगुरूकुल हौसिंग सोसायटीपांडाभाऊ सानेमोरेवस्तीसिमेंट काँक्रीट रस्तेसिमेंट रस्ता
























Join Our Whatsapp Group