पिंपळे सौदागर (Pclive7.com):- महाराष्ट्राच्या विकासात मोलाचे योगदान देणारे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पिंपळे सौदागर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. समाजसेवेची परंपरा जपत नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

हे रक्तदान शिबिर २२, २६ आणि २७ जुलै २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत महादेव मंदिर, पिंपळे सौदागर येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे आयोजन नाना काटे सोशल फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आले असून माजी विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

स्व. अजितदादा पवार यांनी आपल्या सार्वजनिक जीवनात विकास, जनसेवा आणि लोकहिताची भूमिका कायम जपली. त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमातून त्यांना अभिवादन करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले.

रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळू शकते. त्यामुळे नागरिकांनी पुढाकार घेत रक्तदान करावे आणि समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन करण्यात आले आहे. शिबिरात सहभागी होणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास नाना काटे सोशल फाउंडेशनतर्फे आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान; स्व. अजितदादांना रक्तदानातूनच खरी आदरांजली!” अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे.





















Join Our Whatsapp Group