पिंपरी (Pclive7.com):- वाकड येथील दत्त मंदिर रस्त्याचे खोदकाम चालू असताना MNGL गॅसची पाईपलाइन फुटली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गॅस गळती होती आहे. तसेच पिंपरी चिंचवडमधील अनेक सोसायट्यांचा गॅस पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

वाकड येथील दत्त मंदिर येथील उत्कर्ष चौक येथे रस्त्याचे काम सुरू आहे. या खोदकामा दरम्यान एमएनजीएल लाइन फुटली आहे. त्यामुळे वाकड परिसरातील तब्बल दीडशे ते दोनशे सोसायट्यांचा गॅस पुरवठा खंडीत झाला आहे. तसेच खोदकामाच्या जागी मोठ्या प्रमाणावर गॅस गळती झाली आहे.
यामुळे सोसायटीतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला आहे. वाकडमधील दत्त मंदिर रस्त्याचे काम चालू असताना MNGL ची पाइपलाईन महापालिकेचा कॉन्ट्रॅक्टर कसा काय तोडू शकतो? यासाठी पालिकेतील कोणते अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांना पालिका जवाबदार धरून कारवाई करणार का? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.






















Join Our Whatsapp Group