पिंपरी (Pclive7.com):- एका महिलेला नोकरीचे आमिष दाखवून लिंक पाठवत वेगवेगळ्या टास्कद्वारे महिलेला १३ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. हा प्रकार ३ ते ५ एप्रिल २०२३ या कालावधीत घडला आहे.
याप्रकरणी महिलेने गुरुवारी (दि.१८) चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी प्रकाश दास, तीन महिला आरोपी व विविध बँक खातेधारक अशा १३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना नोकरीचे आमिष दाख वून आरोपींनी विविध लिंक पाठवून टास्क दिले. त्यानुसार, आरोपींनी टास्कद्वारे महिलेकडून ९ लाख ७५ हजार रुपये ट्रान्सफर करून घेतले. तसेच फिर्यादी यांच्या नफ्याची रक्कम परत न देता त्यांनी एकूण १३ लाख ४५ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.