पिंपरी (Pclive7.com):- पुणे महानगरपालिकेच्या धर्तीवर पिंपरी चिंचवड महापालिकेने निवासी बांधकामांना मिळकत करात ४० टक्के सवलत योजना राबवावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे. यासंदर्भात भापकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे.
![](https://pclive7.com/wp-content/uploads/2023/06/IMG-20230415-WA0028-300x150.jpg)
मारुती भापकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुणे महापालिका क्षेत्रात स्वतःच्या मालकीच्या घरात राहत असल्यास मिळकतकरात ४० टक्के सवलत मिळत होती. मात्र सन २०१८ मध्ये ही सवलत रद्द करण्यात आली. याचा फटका ९७ हजार ५०० मिळतधारकांना बसला. पुणे महापालिका हद्दीत १ एप्रिल २०१९ पासून नव्याने समाविष्ट झालेल्या मिळकत धारकांना ४० टक्के कर सवलत १ लाख ६७ हजार मिळकत धारकांना मिळाली नाही. त्यानंतर ५ लाख मिळकत धारकांची ही सवलत काढण्याचे काम सुरू होते. आता मिळकत करात ४० टक्के सवलत कायम ठेवण्याचा फायदा पुण्यातील साडेसात लाख मिळकत धारकांना मिळत आहे. पुणे महानगरपालिकेच्या या योजनेमुळे मिळकत धारकांचे सुमारे २०० कोटी रुपये माफ होणार झाले आहे.
पुणे महानगरपालिकेच्या वतीने निवासी बांधकामांना मिळकत करात ४० टक्के सवलत देण्याची ही योजना स्वागताहार्य असून पिंपरी चिंचवड महापालिकेने देखील पुणे महापालिकेच्या या योजनेच्या धर्तीवर शहरातील निवासी बांधकामांना ४० टक्के मिळकत करात सवलत देण्याची योजना राबवावी. अशी आमची मागणी आहे. तरी हे जनहितार्थ आदेश निर्गमित करावे असे मारुती भापकर यांनी म्हटले आहे.
Tags: Devendra FadnavisEknath Shindemaruti bhapkarPcmc newsPcmc Property taxPcmc TaxPcmc Tax DepartmentPimpri Chinchwad Municipal CorporationPune Municipal Corporation