पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रोड वरील छत्रपती चौकातील, नवीन बांधकाम चालु असलेल्या ठिकाणी भुत्सकलन होवुन रस्ता खचला आहे. आज पहाटे ही घटना घडली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली आहे. माजी विरोधी पक्षनेते नाना काटे आणि माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, माजी नगरसेविका निर्मला कुटे यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली असून प्रशासनाला कळवले आहे.
याठिकाणी रस्त्यात असलेली पाणी पुरवठा लाईन, व स्ट्रॉम वॅाटर लाईन देखील तुटलेली आहे. पहाटेच्यावेळी ही घटना घडली असुन, कोणतीही जिवीतहानी झाली नाही. नाना काटे, शत्रुघ्न काटे, निर्मला कुटे यांनी संबधित बांधकाम व्यावसायीक, मनपा अधिकारी, पाणी पुरवठा विभाग व पोलीस प्रशासनास सांगुन त्वरीत उपायोजना करण्यास सांगितले.
त्यानुसार पोलीस व मनपा विभाग यांनी बॅरीकेटीग केले असून हा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे पाईप लाईन व रस्ता दुरूस्ती करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.