पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर मधील कुणाल आयकॉन रस्त्याचे अद्यावत काम लवकरच सुरू होणार आहे. माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी यासंदर्भात महापालिका अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
या संदर्भात आज (दि.२८) रोजी नगरसेवक शत्रुघ्न काटे आणि महापालिकेचे स्थापत्य प्रकल्प अधिकारी, आर्किटेक्ट व कन्सलटंन्ट यांच्या सोबत एक बैठक पार पडली. सदर बैठकीत नियोजित आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. शत्रुघ्न काटे यांनी याकामाची निविदा लवकरात लवकर काढावी आणि काम सुरू करावे अश्या सूचनाही संबंधित विभाग प्रमुख, आर्किटेक्ट आणि कन्सलटंन्ट यांना दिल्या आहेत.
सदर काम सुरू करण्यापूर्वी भूमिगत असलेल्या स्टोर्म लाईन, पाणीपुरवठा लाईन, MSEB केबल्स याच्याशी निगडीत असलेल्या उपाययोजना करण्याच्या सूचना शत्रुघ्न काटे यांनी केल्या आहेत. या बैठकी दरम्यान स्थापत्य प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीमती संध्या वाघ, उपअभियंता श्री.संजय काशीद, इन्फ्रा कंन्सलटंट कंपीनीचे सल्लागार श्री.लक्ष्मीकांत पतंगे, श्री. रणजीत कोल्हे व इतर कर्मचारी उपस्थित होते.