पिंपरी (Pclive7.com):- गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असताना एका तरुणाचा मृत्यू झाला. हिंजवडी येथे बुधवारी (दि. २७) रात्री ही घटना घडली. योगेश अभिमन्यू साखरे (२३, रा. हिंजवडी) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. दरम्यान हिंजवडी पोलिसांनी या

मिळालेल्या माहितीनुसार, हिंजवडी येथे बुधवारी गणेश विसर्जन मिरवणूक सुरू होती. योगेश साखरे हा देखील मिरवणुकीत सहभागी झाला होता. दरम्यान, नाचत असताना योगेश याला त्रास जाणवू लागला. त्यामुळे तो नजिकच्या मेडिकलमध्ये गोळ्या घेण्यासाठी गेला. त्यावेळी तो चक्कर येऊन पडला.
त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी पोलिसांना सांगितले. योगेश याचा मृत्यू कशामुळे झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. हिंजवडी पोलिस तपास करीत आहेत.




















Join Our Whatsapp Group