पिंपरी (Pclive7.com):- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्याच्या वतीने संपूर्ण महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार असून, त्याअंतर्गत १७ सप्टेंबर रोजी ‘आशीर्वाद का दीया’ हा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमात शहरातील दोन लाखांहून अधिक नागरिकांनी हातात दिवे घेऊन पंतप्रधान मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी केले आहे.

भाजप शहर जिल्ह्याने या उपक्रमासाठी व्यापक नियोजन केले असून, ‘आशीर्वाद का दीया’ हा उपक्रम विक्रमी स्वरूपात पार पाडण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या अभियानाचे शहर संयोजक म्हणून भाजप शहर जिल्हा महामंत्री मधुकर बच्चे यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत रोजगार मेळावे, रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे, ‘स्वप्नाचा भारत’ उपक्रम, चित्रकला व भाषण स्पर्धा, नमो सेवा गाथा, अंगणवाडी सेविका सन्मान, विकासकामांवरील रील स्पर्धा, सेवादीप यात्रा, सेवा सेतू अभियान, रांगोळी स्पर्धा, विकसित भारत संकल्प यात्रा, इनोव्हेशन चॅलेंज आणि जनसेवेचा महाकुंभ यांसारखे विविध समाजोपयोगी व सेवाभावी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

या अभियानात शहर प्रभारी भरत नाना पाटील, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे, आमदार शंकर जगताप, महेश लांडगे, उमाताई खापरे, अमित गोरखे, माजी आमदार अश्विनी जगताप, सेवा संकल्प अभियान प्रमुख मोरेश्वर शेडगे, महामंत्री विकास डोळस, वैशाली खाडे, महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे, युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश यादव, वरिष्ठ उपाध्यक्ष संजय पटणी यांच्यासह विविध आघाड्या, मोर्चे, प्रकोष्ठांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
तसेच चिंचवड, भोसरी आणि पिंपरी विधानसभा क्षेत्रांसाठी स्वतंत्र समित्यांची नियुक्ती करण्यात आली असून, स्थानिक पदाधिकारी व मंडल अध्यक्षांवर उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनीही १७ सप्टेंबर रोजी आपल्या हातात दिवा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.



















Join Our Whatsapp Group